सावंतवाडी
मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या माध्यमातून आज उपविभागीय अधिकारी व सावंतवाडी तहसीलदार याना बोगस पासचा वापर करून गोव्याकडे बेकायदेशीररित्या वाळू ओव्हरलोड करून नेली जात असल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे. यावर कारवाई न केल्यास मनसेचे कार्यकर्ते चेकपोस्ट वर उभे राहून राज्य शासनाचा महसूल बुडवून चोरट्या पद्धतीने वाळू वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, देवेंद्र कदम, आकाश परब, रोशन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.