You are currently viewing तौकीर शेख यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

तौकीर शेख यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

तौकीर शेख यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

अरविंद मोंडकर यांच्या शिफारशीनुसार नियुक्ती; १४ सप्टेंबरला सावंतवाडीत सत्कार

सावंतवाडी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सावंतवाडीचे नगरसेवक तौकीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष अरविंद मोनकर यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती झाली.
नियुक्तीबद्दल तौकीर शेख यांचा सत्कार व अभिनंदन सोहळा सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता, चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडी येथील जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानच्या कार्यालयात, उभा बाजार, सुवर्णपेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र मापसेकर व तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तौकीर शेख यांना शिफारस पत्र देऊन पुष्पगुच्छाने सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास काँग्रेसचे पदाधिकारी, महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजेंद्र प्रभाकर मसुरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा