हुमरमळा (वालावल) ग्रामस्थांना प्रत्येक योजना गावातच मिळाल्या पाहिजेत यासाठी आपले प्रयत्न – – – – श्री अतुल बंगे
कुडाळ (प्रतिनिधी)
हुमरमळा (वालावल) गावातील ग्रामस्थ व महीला आणि युवकांना शासकीय योजना ही गावातच मिळाली पाहिजे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशिल असतो असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे यांनी केले
हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये ncmc कार्ड नोंदणी शिबीराचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन श्री बंगे व सरपंच श्री अमृत देसाई यांच्या शुभहस्ते झाले यावेळी श्री बंगे बोलताना म्हणाले कि शासनाच्या योजना घराघरात पोचवण्यासाठी आणि नविन आलेल्या योजना माझ्या गावातील नागरीकांना कशा मिळतील यासाठी कायमच प्रयत्नशिल असतो तसेच हुमरमळा वालावल ग्रामपंचायत सरपंच अमृत देसाई आणि पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामसेविका श्रीम अपर्णा पाटील यांच्या प्रशासकीय मार्गदर्शनाखाली गावातील विकासाबरोबरच योजनाही पोच होत आहे असे सांगून श्री बंगे म्हणाले माझ्या गावातील नागरीक कुडाळ मध्ये जावुन एस टी चे कार्ड काढण्यासाठी हेलपाटे मारणे योग्य नसल्यानेच आज या शिबिराचे आयोजन केल्याचे स्पष्ट श्री बंगे यांनी केले यावेळी वैभव जाधव, सरपंच श्री अमृत देसाई, पोलीस पाटील सुबोध सावंत, दादा मयेकर, शैलेश मयेकर, अमित बंगे, आदी शिबिरार्थी उपस्थित होते
