You are currently viewing गंमत जंमत

गंमत जंमत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित बडबडगीत*

 

*गंमत जंमत* 

 

सू…सू…करीत वारा आला

इकडे तिकडे फिरू लागला

 

सळसळ सळ पाने नाचले

ढमढम ढमढम ढग वाजले

 

लखलखाट वीज चमकली

कडकडाट जोरात कडाडली

 

टीप टीप टीप पाऊस आला

धो धो धो धो वाहू लागला

 

अंगण सारं ओलं झालं

खळ खळ खळ पाणी वाहिलं

 

चला चला पावसात भिजायला

तेवढ्यात पाऊस थांबला

 

आईने केली भजी

गरमागरम ताजी

 

भजी खाऊ गप्पा मारू

गंमत जंमत झोपी जाऊ

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

प्रतिक्रिया व्यक्त करा