You are currently viewing “देवा मला पावशील का?”

“देवा मला पावशील का?”

*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम विडंबन गीत*

 

*”देवा मला पावशील का?”*

 

पाटेकर देवा मला पावशील का?

नेत्यांना चांगली “बुध्दी” देशील का? /१/ धृ

 

रस्ता कमी” खड्डे” ज्यादा

मोडून गेली “हाडे”

मणक्यांच्या आजारांवर

“डॉक्टर ” बांधती वाडे

 

सगळा “निधी ” जातो कुठे

सांगशील का? /२/ नेत्यांना.

 

“निवडणूक” येते तेव्हा

आश्वासने गोड

पावसाचे कारण सांगून

राहून जातो “रोड”

 

सगळा निधी जातो कुठे

सांगतील का? /३/ नेत्यांना

 

आले किती,गेले किती

पुन्हा “तेच तेच ”

विकासाचे काय होते

जनतेला पेच

 

सगळा निधी जातो कुठे?

सांगतील का. /४/. नेत्यांना

 

“अत्यवस्थ” रुग्ण जेव्हा

सुंदरवाडीस असतो

GMC च्या वारी शिवाय

पर्यायच नसतो

 

सगळा निधी जातो कुठे?

सांगतील का. /५/ नेत्यांना

 

“जनतेच्या गैरसोयी

यांच्या सुखसोयी ”

शेतं पिकण्यावेळी त्याला

कुंपणच खाई.

 

सगळा निधी जातो कुठे?

सांगतील का? /६/ नेत्यांना

 

पुरे झाले माझे रडणे

पुरे “वात्रटिका”

सुंदर “खड्ड्यांमुळे”झाला

अहो ” सायाटिका”

 

सगळा निधी जातो कुठे?

सांगतील का? /७/ नेत्यांना

 

पाटेकर देवा मला पावशील का?

नेत्यांना चांगली बुध्दी देशील का….

 

सुप्रसिद्ध गायक:- स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या ” आता तरी देवा मला पावशील का” या गाण्याचीच चाल घेऊन व स्व. प्रल्हाद शिंदे यांची माफी मागून.. हे काव्य ” सुंदरवाडी तील रस्त्यांना समर्पित…

रचना:- मोहन मराठे.

प्रतिक्रिया व्यक्त करा