सिंधुदुर्गनरी –
दोडामार्ग तालुक्यातील मौजे भेडशी – भोमवाडी, मौजे कुडासे – धनगरवाडी, मौजे झरेबांबर – धनगरवाडी येथे दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. मौजे कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील सुरुचिवाडी येथे दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत कंटेन्मेंट झोन असणार आहे. मौजे परमे- देऊळवाडी आणि मौजे आयी – खालचीवाडी येथे दिनांक 17 सप्टेंबर 2020 रोजीपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्यात आला आहे
या सर्व कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या तराखांपर्यंत रात्री 12.00 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.