दिलासा समूहाच्या वतीने शहरातील शिक्षकांचा सन्मान
पिंपरी (दिनांक : ०६ सप्टेंबर २०२६)
दिलासा साहित्य सेवा संघ आणि ओम साई ट्रॅव्हल्सच्या वतीने पिंपरी – चिंचवड शहरातील आदर्श शिक्षकांचा सन्मान शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक पांडेश्वर मंदिराच्या प्रांगणात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांच्या हस्ते शिक्षकांना ‘हर हर महादेव’ या जयघोषात शाल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सन्मानाने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार होते.
याप्रसंगी दिलासा समूहाचे अध्यक्ष सुरेश कंक, ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, कैलास भैरट, प्रकाश घोरपडे, विलास कुंभार, संगीता जोगदंड हे मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी
योगिता कोठेकर (त्रिवेणीनगर), शामला पंडित दीक्षित (रावेत), अंबादास रोडे (थेरगाव), सुभाष चटणे (चिंचवडगाव), तानाजी एकोंडे (काळेवाडी), भाऊसाहेब गायकवाड (त्रिवेणीनगर),
बाळकृष्ण अमृतकर (रहाटणी), अरुण चव्हाण (रहाटणी) या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी अण्णा जोगदंड म्हणाले… ‘मोबाइल आणि इंटरनेटच्या या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना पुस्तकी अभ्यासक्रम शिकविण्याचे कौशल्य जपत संस्काराची शिदोरी देण्याचे काम शिक्षक करीत असतात. या गुरुजनांना वंदन करताना अत्यानंद होत आहे.’
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण कुंभार म्हणाले… ‘कुंभार जसे मडके घडवतो तसे शिक्षक विद्यार्थी घडवीत असतात. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याची खरी गरज आहे!’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलासा समूहाचे शामराव सरकाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप गांधलीकर यांनी केले; तर आभार मुरलीधर दळवी यांनी मानले.
मीरा कंक, दैवता घोरपडे, हिरामण देवरे, सुरेश चव्हाण, उज्ज्वला पवार, सुनंदा अमृतकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
