You are currently viewing रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा रत्नागिरी तर्फे सागरी सुरक्षा कार्यक्रम संपन्न….

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा रत्नागिरी तर्फे सागरी सुरक्षा कार्यक्रम संपन्न….

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा रत्नागिरी, भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सहकारी संस्था, रत्नागिरी यांच्या सयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा या विषयी कार्यक्रम करण्यात आला.

भारताच्या स्वातंत्राच्या गौरवशाली 75 वर्षाच्या पूर्ततेच्या अनुषंगाने भारत सरकारने “भारत का अमृत महोत्सव” हा उपक्रम राबवण्यास सुरवात केली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा रत्नागिरी, भारतीय तटरक्षक दल, रत्नागिरी व कर्ला मच्छिमार सहकारी संस्था, रत्नागिरी यांच्या सयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा या विषयी कार्यक्रमाचे आयोजन कर्ला मच्छिमार सोसायटीमध्ये केले होते.

या कार्यक्रमामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे कमांडड डीआयजी श्री के. ल. अरुण यांची मुख्य उपस्थिती होती. कमांडड डीआयजी श्री के. ल. अरुण यांनी मच्छिमारानि समुद्रामध्ये मासेमारी करत असताना घ्यावयाची काळजी, तसेच मासेमार हे तटरक्षक दलाचे मित्र असून मासेमारांना भारतीय तटरक्षक दलाकडून संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वाशन दिले. भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरी स्टेशनचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख श्री डी.पी. टोमर यांनी लाइफ जॅकेट , लाइफ बोया यांचे योग्य उपयोग व वापरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच मासेमारानी समुद्रात जात असताना बोटीवरील सर्व मासेमारचे ओळखपत्र, बोटीचे कागदपत्रे घेऊनच समुद्रात जावे असे आव्हाहन केले. श्री टोमर यांनी तटरक्षक दलाचा आपत्कालीन संपर्क क्रमांक देऊन समुद्रामध्ये जर एखादी अनोळखी किवा संशयित बोट किवा व्यक्ति आढळल्यास तात्काळ तटरक्षक दलाला कळवण्याचे आव्हाहन केले आहे. यावेळी कर्ला सहकारी मच्छिमार संस्थेचे चेअरमन श्री नदीम सोळकर यांनी भारतीय तटरक्षक दल व रिलायन्स फाऊंडेशनचे चे स्वागत केले व भारतीय तटरक्षक दल मासेमारांसाठी समुद्रामध्ये किती महत्वाचा दुवा आहे याची माहिती दिली तसेच रिलायन्स फाउंडेशन व भारतीय तटरक्षक दलाचे मासेमारांसाठी करत असलेल्या कामाचे आभार मानले.

रिलायन्स फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे यांनी “भारत का अमृत महोत्सव” या उपक्रमाबद्दल माहिती देऊन रिलायन्स फाऊंडेशनचे मासेमारणासाठी करत असलेल्या कामाची माहिती दिली . रत्नागिरी शहरी पोलिस विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री विजय जाधव यांनी मिशन सागर बद्दला मासेमारांना माहिती दिली. भारतीय तटरक्षक दल रत्नागिरीचे डेप्युटी कमांडाड श्री सचिन, श्री. सुधीर, श्री चिरंजी लाल, मत्स्य व्यवस्याय विभागाचे श्री सहायक मत्स्य विकास अधिकारी श्री. एस .एच . पाठारे, सागरी पोलीसचे श्री सुहास मांडवकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक श्री चिन्मय साळवी यांनी केले. तसेच कर्ला मच्छिमार सहकारी संस्था, रत्नागिरी यांनी कार्यक्रमाच्या आयोजन केले. कार्यक्रम करोनाच्या अनुषंगाने सर्व नियम पाळून करण्यात आला होता

प्रतिक्रिया व्यक्त करा