*आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती*
*कुडाळ मालवण मधील विकास कामांसंदर्भात चर्चा*
कुडाळ :
कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबईत वास्तव्यास असलेले चाकरमानी, शिवसेना पदाधिकारी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य, शैक्षणिक संस्था व विविध संस्थांचे पदाधिकारी यांची बैठक कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मंगळवार १६ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन दादर मुंबई येथे आयोजित केली आहे. सोशल डिस्टन्सिंग व कोरोणा विषयक सर्व नियम अटींचे पालन करून ही बैठक घेतली जाणार आहे.
मुंबईत वास्तव्यास असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील चाकरमान्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी, कुडाळ मालवण तालुक्यांमधील गावातील विकास कामे मार्गी लावण्याच्या दृष्टीने हि बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी आ. वैभव नाईक गावातील विकास कामे जाणून घेणार असून विकासकामांची निवेदने घेऊन त्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. तरी मुंबईत वास्तव्यास असलेल्या कुडाळ मालवण मतदारसंघातील चाकरमान्यांनी यावेळी उपस्थित रहावे. विकास कामे असतील तर त्यासंदर्भातील पत्रव्यवहार/निवेदने सोबत आणावीत असे आवाहन आ. वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे (संपर्कासाठी मो.नं. – ९३२२९०९२७७) यांनी केले आहे.