You are currently viewing आंबेरीत ९ सप्टेंबर रोजी भव्य कृषी, पशुसंवर्धन मार्गदर्शन आणि NCMC कार्ड नोंदणी शिबीर

आंबेरीत ९ सप्टेंबर रोजी भव्य कृषी, पशुसंवर्धन मार्गदर्शन आणि NCMC कार्ड नोंदणी शिबीर

आंबेरीत ९ सप्टेंबर रोजी भव्य कृषी, पशुसंवर्धन मार्गदर्शन आणि NCMC कार्ड नोंदणी शिबीर

मालवण
मालवण तालुका भारतीय जनता पक्ष आणि मालवण भाजप उपाध्यक्ष राजन मुकुंद आंबेरकर व मित्र परिवाराच्या वतीने सकलेश्वर मंदिर, आंबेरी येथे एक दिवसीय भव्य संयुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पार पडणार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या NCMC कार्डची नोंदणी करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

कृषी व पशुसंवर्धन मार्गदर्शन:
या संयुक्त शिबिरात मालवण तालुक्याचे कृषी अधिकारी अमोल करंदीकर उपस्थित राहून शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना, ट्रॅक्टर व कृषी अवजारे अनुदान, ठिबक व तुषार सिंचन योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी याविषयी सविस्तर माहिती देतील.
तसेच पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त आणि मालवणचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी डॉ. सुधीर कानसे हे पशुपालकांना दुग्धव्यवसाय, शेळी-मेंढी पालन योजना, राष्ट्रीय गोकुळ मिशन, पशुधन आरोग्य विमा आणि कुक्कुटपालन व्यवसायासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानाची व कर्जाची महत्त्वपूर्ण माहिती देणार आहेत.

MSRTC प्रवाशांसाठी NCMC कार्ड कॅम्प:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासादरम्यान NCMC कार्ड अनिवार्य केले आहे. प्रवाशांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून या शिबिरात जागेवरच कार्ड काढून देण्याची विशेष सोय करण्यात आली आहे. या कार्डसाठी लागणारी ₹२५०/- फी लाभार्थ्याला स्वतः जागेवर द्यावी लागेल. कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी सोबत आधार कार्ड, चालू मोबाईल नंबर आणि वयाचा पुरावा आणणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा