वेदनांनाही ना राहिली किंमत आता,
वेदना सोसण्याची ना उरली हिम्मत आता.
दुरूनच फुंकर मारतील लोक वेदनांवर,
सोशिकतेची हसूनच पाहतात गंमत आता.
सुखालाही विसर पडतो एकवेळ हसण्याचा,
लपाछपीच्या खेळातही ना उरली जम्मत आता.
कैक मागण्या मागितल्या होत्या तिच्यासाठीच,
प्रश्न एकच, का मागावी मी मन्नत आता.
अंधारातच शोधतो आनंद मी काजव्यापरी,
सुर्यालाही लागते ग्रहण हे मज संमत आता.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६