You are currently viewing कांदा कचोरी

कांदा कचोरी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ. मानसी बापट लिखित लज्जतदार पाककृती*

 

*कांदा कचोरी*

 

*साहित्य…*

2 वाटी कांदा बारीक चिरून,1 वाटी पातळ पोहे,तिखट,मीठ,चाट मसाला 2 चमचे,कणिक, तांदूळ पीठ 2 मोठे चमचे.

 

*कृती…*

प्रथम कांदा, पोहे ,तिखट, मीठ चाट मसाला, एकत्र करून घेणे. आवडत असेल तर त्यात एक चमचा कसुरी मेथी घालणे. हे झाले आपले सारण तयार.

कणिक, तांदूळ पीठ मीठ आणि 2 चमचे तेल एकत्र करून पाणी घालून भिजवणे. 15 मिनीटे ठेवून मग त्याची छोटी पुरी लाटून त्यात सारण भरणे. त्याला कचोरी चा आकार देणे. कढई मध्ये तेल गरम करून घेणे आणि त्यात एक एक कचोरी टाकून छान तळणे. गरमागरम कचोरी टोमॅटो सॉस बरोबर खाणे.

 

सौ मानसी बापट बंगलोर

प्रतिक्रिया व्यक्त करा