You are currently viewing असा पाऊस

असा पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री देशकुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*असा पाऊस* 

 

असा पाऊस पाऊस

मनी माझ्या पालवतो

रुणझूण रुणझूण

बाई नर्तन करितो

 

मन माझे घेई झोका

येई सय माहेराची

गंध आणी ग जाईचा

मंद झूळूक वाऱ्याची

 

असा झिम्माड पाऊस

येतो घेऊन श्रावण

चाहूकडे हिरवळ

येई आनंदा उधाण

 

झरे करिती गुंजन

झाले डोंगर हिरवे

करी मधुर गायन

झाडीतून हिरवे रावे

 

जयश्री देशकुलकर्णी

कोथरूड, पुणे -३८

प्रतिक्रिया व्यक्त करा