सावंतवाडी :
माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. कोविड प्रतिबंधक लस सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी मोफत दिली जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माणगाव प्राथमिक विभागाचे अधिकारी डॉक्टर उमेश पाटील यांनी केले आहे. दरम्यान माणगाव येथील केंद्रावर गेल्या दोन दिवसात 140 जणांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली.