You are currently viewing मोटारसायकल अपघातात रवींद्र स्वार जखमी; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार

मोटारसायकल अपघातात रवींद्र स्वार जखमी; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार

मोटारसायकल अपघातात रवींद्र स्वार जखमी; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार

कोलगावहून सावंतवाडीकडे येताना घडला अपघात; अमित गवंढळकर यांनी दाखवली तत्परता

सावंतवाडी :

कळसुलकर इंग्लिश स्कूलचे संचालक तसेच सावंतवाडी उभा बाजार येथील आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरचे उद्योजक रवींद्र वामन स्वार हे कोलगाव येथून सावंतवाडीकडे मोटारसायकलने येत असताना सोमवारी छोटा अपघात झाला. या अपघातानंतर ते काही काळ बेशुद्ध पडले.
अपघाताची माहिती मिळताच त्या मार्गावरून कुडाळच्या दिशेने जात असलेले वैश्य समाजाचे अध्यक्ष अमित गवंढळकर यांनी तत्काळ घटनास्थळी थांबून रवींद्र स्वार यांना मदत केली. त्यांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
रुग्णालयात डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून औषधोपचार व इंजेक्शन देत उपचार सुरू केले. सध्या रवींद्र स्वार यांची प्रकृती स्थिर व ठीक असून, त्यांच्यावर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विशाल रेड्डी, एमबीबीएस डॉक्टर तसेच परिचारिका त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आवश्यक उपचार करत आहेत. अपघातानंतर वेळेत मदत मिळाल्याने पुढील उपचार तातडीने सुरू करता आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा