You are currently viewing कोळाच्या शेंगा

कोळाच्या शेंगा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण मानसी बापट लिखित लज्जतदार पाककृती*

 

*कोळाच्या शेंगा*

 

*साहित्य…*

६ शेवग्याच्या शेंगा तुकडे करून,एका नारळाचे दूध,चिंच कोळून 2 चमचे, गूळ, तिखट,कडीपत्ता,१चमचा बेसन पीठ, तेल मोठे 2 चमचे.

 

*कृती….*

प्रथम पाणी घालून शेवग्याच्या शेंगांचे तुकडे वाफवून घ्यावे. एकीकडे नारळ खवून त्याचे मिक्सर मध्ये दूध काढून घ्यावे. चिंच कोळून त्यात गूळ घालून ठेवावे. आता कढई मध्ये तेल घालून गरम करावे, फोडणी मध्ये कडीपत्ता, लाल मिरच्यांचे तुकडे घालावे, हळद, हिंग घालावे. आता त्यात वाफवलेल्या शेंगा घालून जरा परतावे नंतर नारळाच्या दुधाला १ चमचा बेसन लावून ते दूध कढई मध्ये घालावे. गॅस बारीक असावा. आता त्यात कोळलेली चिंच, गूळ, लाल तिखट, गोडा मसाला आवडत असल्यास घालावा. एक वाफ आणावी. कोळाच्या शेंगा खाण्यास तयार.

 

*सौ मानसी बापट बंगलोर*

प्रतिक्रिया व्यक्त करा