अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तफेँ सामाजिक बांधिलकीतून विनामूल्य जनहित याचिका लढविणारे वकील महेश राऊळ यांचा सत्कार.
सावंतवाडी
आज कोलगाव सावंतवाडी: मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटल आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रकरणी अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तफेँ सामाजिक बांधिलकीतून विनामूल्य जनहित याचिका लढविणारे वकील महेश राऊळ यांचा आज कोलगाव (ता.सावंतवाडी)निवासस्थानी विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सावंतवाडीचे सुपूत्र असलेल्या श्री.राऊळ यांनी कसलिही अपेक्षा न करता केवळ आपल्या गावात दजेँदार आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून उच्च न्यायालयात अभिनव फाऊंडेशन च्या जनहित याचिके प्रकरणी सातत्याने बाजू मांडली. अभ्यासपूर्ण आणि सबळ पुराव्यांसह सावंतवाडी
उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लावून धरला. त्यामुळे सकिँट बेंच कोल्हापूर ने सत्यशोधन समिती नेमून अहवाल मागवला. मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलच्या जागे संबधीचा प्रश्न पण ऐरणीवर आला; याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने आज सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, आरोग्य कृती समिती, जेष्ठ नागरिक संघ,परिवर्तन फाऊंडेशन यांच्या वतीने सोसायटीचे अध्यक्ष शैलेश यांच्या हस्ते अँड. राऊळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सावंतवाडी सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै,सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी रवी जाधव, रूपा मुद्राळे,समीरा खलील, लक्ष्मण कदम आरोग्य आरोग्य कृती समितीचे अध्यक्ष एन.बी.रेडकर, राहुल परब, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष किशोर चिटणीस, सचिव अण्णा म्हापसेकर, सहसचिव राजू केळुसकर, खजिनदार जितेंद्र मोरजकर, आरोग्य कृती समितीचे क्रूझ फर्नांडिस, रविंद्र ओगले, ग्राहक पंचायतीचे प्रा.सुभाष गोवेकर, परिवर्तन फाऊंडेशन चे अध्यक्ष सुशिल आमुणेकर, राहुल राणे, महादेव गावडे, अर्थव गावडे, रोहित जाधव, अजित नाईक, अक्षय नाईक, साधना तेंडुलकर/धोंड आदी विविध संस्था पदाधिकारी उपस्थित होते.
अँड.राऊळ म्हणाले, अजून बराच मोठा टप्पा गाठायचा आहे.त्यासाठी सर्वांनी एकजूटीने एकत्र येऊन प्रयत्न, पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यामुळे आरोग्य प्रश्नावर होणारी फरफट थांबू शकेल.
