सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने आमदार कपिल पाटील चषक 2021. जिल्हा स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा शनिवार दि . १३-०३-२०२१ ते रविवार दि . १४-०३-२०२१ रोजी आयोजित केली आहे यासाठी प्रवेश फी -५०० रुपये असून . प्रथम येणा-या बारा शिक्षक संघानाच प्रवेश देण्यात येणार आहे .
प्रथम क्रमांक- ७७७७ / – रुपये व चषक मा. श्री .दया नाईक, राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती -प्रथम क्रमांकाचा चषक , प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली कडून. द्वितीय क्रमांक -५५५५ / – रुपये व चषक मा श्री किसन दुखंडे, राज्य संघटक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती द्वितीय क्रमांक चषक श्री विजय चौकेकर शिक्षक नेते शिक्षक भारती मालवण यांजकडून इतर आकर्षक बक्षिसे • उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज प्रत्येकी 555 / – श्री तुकाराम खिल्लारे यांचेकडून • सलग ३ षटकार किंवा सलग ३ विकेट ५००/- रु व मालिका वीर ५५५/- व चषक श्री. रामचंद्र डोईफोडे जिल्हा मुख्य संघटक शिक्षक भारती सिंधुदुर्ग , यांचेकडून • तसेच स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूला भेटवस्तू व प्रमाणपत्र , सेमिफायनल सहभागी संघांना आकर्षक ट्रॉफी . स्थळ – क्रीडा संकुल ओरोस
स्पर्धेचे नियम व अटी
१. ही स्पर्धा फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी आहे .
२. संघ एकाच तालुक्यातील असावा . एकाच तालुक्यातील कितीही संघ सहभागी होऊ शकतील .
३. प्रथम येणाऱ्या १२ संघांना प्राधान्य देण्यात येईल .
४.सर्व सामने मर्यादित षटकाचे खेळवण्यात येतील सामने साखळी पध्दतीने खेळविण्यात येतील .
५.. पंचाचा निर्णय अंतिम राहिल . खेळाडूला दुखापत झाल्यास स्वतःची जबाबदारी असेल .
६. वरील नियमांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार फक्त कमिटीकडे राहतील याची नोंद घ्यावी .
७.कोरोना १९च्या प्रादुर्भाव च्या सर्व नियमांचे पालन करायचे आहे गुरुवार दि – ११/०३/२०२१ दुपारी १२:०० वाजेपर्यंत ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रवेश फी भरून संघांची नाव नोंदणी करावी. नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक
बंडू राठोड 9359156396 सागर कुराडे 9405838020 वसंत गर्कल 7588056729 नोंदणी शुल्क साठी – विनेश भिकू जाधव Ac no . 31110673164 IFSC – SBIN00012213 GOOGLE PAY -9405920069
तरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष व अरूण पवार जिल्हा सरचिटणीस व महेश नाईक मुख्य सल्लागार यांनी केले आहे.