You are currently viewing वंदना करंबेळकर यांना ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६’ जाहीर

वंदना करंबेळकर यांना ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६’ जाहीर

वंदना करंबेळकर यांना ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६’ जाहीर

शिक्षण, आरोग्य व महिला सक्षमीकरणातील योगदानाची दखल; २५ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण

मालवण

आचरा येथील वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामविकास बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., आचरा यांच्यावतीने देण्यात येणारा ‘कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार २०२६’ सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वंदना श्रीकृष्ण करंबेळकर यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थेचे चेअरमन मंदार सांबारी यांनी दिली.
कै. श्रीकांत सांबारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. यंदाचा हा चौथा पुरस्कार असून, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वंदना करंबेळकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
शिक्षण, आरोग्य तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात वंदना करंबेळकर यांनी केलेले अमूल्य योगदान लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे चेअरमन मंदार सांबारी यांनी सांगितले.
या पुरस्काराचे वितरण दि. २५ ऑगस्ट रोजी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात येणार आहे. संस्थेच्या या पुरस्कारामुळे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याला प्रोत्साहन मिळत असून, कै. श्रीकांत सांबारी यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा पुढे नेण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा