संपता संपेना ही जीवघेणी,
रस्त्यावरची अपघातांची कथा..
किती जणांचा जातो जीव,
कोणा कोणाच्या ऐकाव्या व्यथा.
रस्ते नसतात धोकादायक,
बेपर्वाई घेते निष्पाप जीव.
रस्त्यावरचे मरण पाहून,
पाहणाऱ्यांसही वाटते किव.
जिथे तिथे फलक असतात,
सुरक्षित जा वेगावर ठेवा मर्यादा.
पुढे धोकादायक वळणे आहेत,
वेगावर ताबा जीवनाचा वादा.
वेळ असतोच कोणाला,
हे असे फलक वाचायला.
जो तो धुंद असतो नशेत,
जोशात लवकर पोचायला.
कर्तीधर्ती कोवळी पोरं जातात,
आई-बाप जिवंतपणी मरतात.
मरणही येत नाही दारात म्हणून,
रोजरोज मरण यातना भोगतात.
चूक नसता आपली,कुणीतरी,
रस्त्यावरच उडवून देतात.
पोरकी होतात मुलंबाळं जेव्हा,
डोळ्या देखत मायबाप जातात.
माणसांपेक्षा जास्त झाली वाहने,
मरण मात्र झालं फारच स्वस्त.
गुरांसारखं मरण रस्त्यावरचं,
तरीही वाहनचालक धुंदीत मस्त.
संपता संपेना….
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६