विटे / सांगली (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
विटा शहराच्या उद्योजकतेला नवी ओळख, नवी संधी,नवी दिशा देणेसाठी एकत्रितपणे पुढे जाऊ असा निर्धार व्यक्त करत, ईश्वरपूर बिझनेस फोरम (आय.बी.एफ.) विटेकर उद्योजकांना मदत करण्यात नेहमीच अग्रेसर राहील असा विश्वास आय.बी.एफ.चे संस्थापक,मार्गदर्शक प्रतिक जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.
ईश्वरपूर बिझनेस फोरमचा विटाचॅप्टर स्थापनेसाठीश्रेयस भवन विटा येथेआयोजित उद्योजक व व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले, “विटा शहराला उद्योगाची मोठी परंपरा असूनविटा परिसरातील लोक अत्यंत उद्यमशील आहेत. दुष्काळी परिस्थितीवर मात करत तालुक्यातील गलाई बांधवांनी संपूर्ण भारतासह नेपाळ,दुबई आदी ठिकाणी सोने-चांदी व्यवसायात मोठा नावलौकिक प्राप्त केलेला आहे. तसेच यंत्रमाग,द्राक्षबाग,भाजीपाला उत्पादन इत्यादी क्षेत्रातही तालुका अग्रगण्य आहे.IBFच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना एकत्रित आणणे,उद्योगवाढीसाठी नवीन संधी निर्माण करणे,परस्पर सहकार्य वाढवणे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विट्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आपण एकत्रीत प्रयत्न करू.”
यावेळी प्रास्ताविक करतानाॲड.संदीप मुळीक म्हणाले, “खानापूर तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग,दोन राज्य महामार्ग व तीन प्रमुख जिल्हा महामार्ग आहेत. तालुक्यात रेवणसिद्ध,वेताळगुरू, दरगोबा अशी तीर्थक्षेत्रे आहेत. टेंभू,ताकारी,आरफळ या उपसा सिंचन योजनांमुळे शेतीसाठी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे विटा शहर व खानापूर तालुक्यात पर्यटन व्यवसाय,शेतीमाल प्रक्रिया व्यवसाय,द्राक्ष,भाजीपाला निर्यात व्यवसाय,औद्योगिक वसाहत मजबूत करणे तसेच नाविन्यपूर्ण व्यवसाय शहरात आणणे अशा अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. आय.बी.एफ. विटाचॅप्टरच्या माध्यमातून विटा शहर व खानापूर तालुक्याच्या उद्योजकतेला मोठी मदत होईल.”
या बैठकीस IBF अध्यक्ष शहाजी पाटील, उपाध्यक्ष सुप्रिया पेठकर, सचिव विश्वजित पवार, जयदीप पाटील, मोहन जाधव, संग्राम देशमुख, महेश कुपाडे, प्रतिभा काटकर, कुलदीप पाटील, विशाल लकडे, प्रशांत जंगम, सागर लकडे, शिरीष शेटे, अमित म्हेत्रे, महेश तारळेकर, सोहम भंडारे, बीराजू किनाथी, नितीन पुणेकर, रवी जाधव यांच्यासह विटा शहरातील अनेक उद्योजक उपस्थित होते.
