You are currently viewing आप्पांच्या गप्पा
Oplus_16908288

आप्पांच्या गप्पा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*आप्पांच्या गप्पा*

 

बेस्ट मध्ये काम करीत असताना खूप गोष्टी माहीत झाल्या. खोसे नावाचे एक निवृत्त सैनिक बेस्ट मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. सहज विषय निघाला म्हणून मी त्यांच्या आडदांड शरीरावर विचारले असता त्यांनी मी लहानपणापासून वडाची फळे खात असल्याचे सांगितले. वडाची फळे वाजीकारक असल्याचे त्यांनी सांगितले. हे वानरांचे आवडते खाद्य असल्याचे त्यांनी सांगितले. गुगल सर्च केले तर ते खरे असल्याचे दिसून आले.

 

त्यामुळे

 

*बंदर कभी बुढा नहीं होता*

 

हे देखील समजले.

 

वाळलेली वडाची फळे खूप स्वस्त मिळतात. चांगल्या आयुर्वेदिक औषध भंडार येथे 60 रुपये प्रति 100 ग्रॅम सहज ऊपलब्ध होतात.

 

पिंपळाची फळे लवकर सुकट नाहीत असे खोसे

यांचे म्हणणे आहे.

 

*वडाची फळे*

 

आयुर्वेदानुसार वडाची फळे आणि वडाच्या इतर भागांना (विशेषतः चीक व पारंब्या) बल्य आणि वाजीकारक (शुक्रल) गुणधर्मांचे मानले जाते. वडाचा वटवृक्ष हा संपूर्ण भारतात आढळणारा आणि आयुर्वेदात औषधी म्हणून गणला गेलेला एक महत्त्वाचा वृक्ष आहे.

वडाची फळे व इतर भागांचे गुणधर्म

शरीराला ताकद देणे: वडाची पक्की फळे व बिया शरीराला थंड, पौष्टिक आणि धातूंना बळ देणाऱ्या मानल्या जातात.

वाजीकारक प्रभाव: आयुर्वेदातील ग्रंथीय माहितीनुसार वडाचा चीक आणि झाडाचे इतर घटक शुक्र धातूची पुष्टी करतात.

धातू सुधारणा: हे प्रजनन संस्था निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.

 

*काळजी आणि इशारा*

कच्चा चीक किंवा फळांचे अयोग्य आणि अतिसेवन पोटासाठी विषारी ठरू शकते.

कोणतीही वनस्पती किंवा औषधी उपचार स्वतःहून करण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्यांचा (डॉक्टरांचा) सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित व योग्य असते.

 

*पिंपळ फळे*

 

आयुर्वेदानुसार पिंपळाची फळे वाजीकारक (शक्ती व वीर्य वाढवणारी) मानली जातात. आयुर्वेद ग्रंथांमध्ये पिंपळाच्या फळांचे विविध औषधी उपयोग सांगितल्याचे आढळतात.

आयुर्वेदिक गुणधर्म व फायदे

धातूवर्धक: पिंपळाची फळे सप्तधातूपोशक आणि शक्तीवर्धक मानली जातात.

धातूक्षीणता व नपुंसकता: ताजी पिंपळाची फळे किंवा फळांचे चूर्ण दुधासोबत घेतल्यास धातूक्षीणता आणि नपुंसकता दूर होण्यास मदत होते असे मानले जाते.

इतर उपयोग: ही फळे पचनक्रिया सुधारण्यास आणि श्वसनविकारांमध्ये देखील उपयुक्त ठरतात.

 

आहे की नाही स्वस्तात मस्त वाजीकारक उपाय. तरीही

आयुर्वेदिक वैद्य असतील त्यांच्या सल्ल्याने उपाय करावा. *अती सर्वत्र वर्जते*. जास्त सेवन करू नका .

घेण्याची पद्धत:

वडाच्या फळांचे चूर्ण सामान्यतः कोमट पाण्यासोबत किंवा मधासोबत घेतले जाऊ शकते.

काही प्रकरणांमध्ये, हे चूर्ण किंवा फळे रात्रभर पाण्यात भिजवून, सकाळी ते पाणी गाळून रिकाम्या पोटी घेण्याची पद्धत आहे.

 

खरं तर वानरे काय काय खातात यावर संशोधन व्हायला पाहिजे. यात पीएचडी देखील करू शकता. नंतर कधी वानरांचे आवडते खाद्य

कपि कुच्छ बद्दल सांगतो. पोस्ट आवडल्यास नावासहीत फॉरवर्ड करू शकता . *अती सर्वत्र वर्जते म्हणून प्रमाणात घ्यावे*. ज्यांना आयुर्वेदिक औषध भंडार येथे वडाच्या फळांचे चूर्ण मिळणार नाही त्यांनी मला कळवावे . मीरा रोड येथील औषधी भांडरचा फोन नंबर देईल.

 

शुभम भवतू

 

विलास कुलकर्णी

( आप्पा महाराज )

मीरा रोड

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा