*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पानापानावर हसू…*
थेंब थेंब टरारले पानापानावर हसू
दवबिंदू चकाकती क्षणातच आम्ही नसू
नसू तर नसू आम्ही सांगा मग काय झाले
आम्ही मातीत मुरता पुन्हा झाडावर असू..
थेंबांचीच ही किमया थेंबे थेंबे तळे साचे
थेंब तारेवर नाचे झोका घेतांना तो दिसे
क्षणभंगुर जीवन थरथर तालावर
कोसळती क्षणातच नाचतच धरेवर…
पानापानात हासती मिचकावतात डोळे
वरुणाची लाडकी ती जणू गोडगोड बाळे
बोली बोलतात काही ओघळते हसू गोड
बोली अवघड भासे मनी पडतसे कोडं..
आलो जीवनी आपण आनंदातच जगावे
देव देतो तेवढेच खुशीखुशीत भोगावे
देणे आपल्या हातात जे जे शक्य देत जावे
स्वत: नादात जगावे इतरांना नादवावे..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
