You are currently viewing कै.विद्याधर भागवत जयंतीनिमित्त आरती मासिक तर्फे काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

कै.विद्याधर भागवत जयंतीनिमित्त आरती मासिक तर्फे काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी :

मागील ४१ वर्षे नियमितपणे सुरू असलेल्या आरती मासिकतर्फे दरवर्षीप्रमाणे विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. ही स्पर्धा होणार आहे. गोवा व सिंधुदुर्ग मर्यादित असून १८ वर्षावरील स्पर्धक भाग घेऊ शकतात.

स्पर्धेसाठी कविता स्वरचित असावी. दीर्घ नसावी. विजेत्यांना स्पर्धेनंतर लगेच प्रमाणपत्र, ग्रंथभेट व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. इच्छुकांनी आपली नावे उषा परब – ९४२३८१८८२८ किंवा भरत गावडे-९४०३०८७७९६ यांच्याकडे २५ ऑगस्टपर्यंत द्यावीत, असे आवाहन आरती मासिक कार्यकारिणीने केले आहे.

सिंधुदुर्गातील नामवंत साहित्यिक कै. विद्याधर भागवत यांचे साहित्यिक चळवळीतील योगदान महत्त्वाचे आहे. याकरिता त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जयंतीनिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा