के.मंजुलक्ष्मी; चार विषय समिती सभापती पदाची निवड २५ मार्चला…
ओरोस
जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची २३ मार्च ला तर चार विषय समिती सभापती पदाची निवड २५ मार्च रोजी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी जाहिर केली आहे.
सत्ताधारी भाजपच्या पक्षीय धोरणानुसार ४ मार्च ला तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यानी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तर याच दिवशी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, महिला व बाल कल्याण सभापती माधुरी बांदेकर, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यामुळे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्याकडे अध्यक्ष पदासह सर्व विषय समिती पदाचे अतिरिक्त पदभार देण्यात आले होते.
आता या रिक्त झालेल्या अध्यक्ष पदासाठी २३ मार्च ला निवडणूक लावण्यात आली आहे. तर वित्त व बांधकाम, शिक्षण व आरोग्य, महिला व बाल कल्याण, समाज कल्याण या चार रिक्त सभापती पदासाठी २५ मार्च ला निवडणूक लावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजल्या पासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर प्रत्येक्ष निवडिसाठी या दोन्ही दिवशी जिल्हा परिषदेची खास सभा बोलाविण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी निवड जाहिर करणार आहेत.