You are currently viewing ओसरगाव-बोर्डवे हायस्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत समूहगीत स्पर्धा उत्साहात

ओसरगाव-बोर्डवे हायस्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत समूहगीत स्पर्धा उत्साहात

ओसरगाव-बोर्डवे हायस्कूलमध्ये ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत समूहगीत स्पर्धा उत्साहात

क्रांती दिन, नागासाकी दिन व जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देत स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची उजळणी

ओसरगाव :

न्यू इंग्लिश स्कूल ओसरगाव-बोर्डवे हायस्कूल येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमात उत्साह निर्माण केला.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विजेत्या संघांना रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचे अध्यक्ष रो. दीपक आळवे सर यांनी विद्यार्थ्यांना ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच नागासाकी अणुबाँब दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व व ऐतिहासिक पार्श्वभूमी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष व संस्थाचालक श्री. सखाराम येंडे सर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील क्रांतिकारकांचे योगदान, त्यांनी भोगलेल्या शिक्षा आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची माहिती दिली. तसेच आजच्या काळातील विद्यार्थ्यांची सामाजिक व राष्ट्रीय भूमिका काय असावी, याबाबत मार्गदर्शन केले.
संस्थाचालक श्री. बबली राणे यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. ठाकूर सर यांनी प्रास्ताविक केले तसेच समूहगीत स्पर्धेचे परीक्षण केले.
या कार्यक्रमास लिपिक श्री. संतोष राठवड, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्ती, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा