You are currently viewing जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धेत “शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचा द्वितीय क्रमांक”

जिल्हास्तरीय समरगीत गायन स्पर्धेत “शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचा द्वितीय क्रमांक”

कुडाळ / पणदूरतिठा :

हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ८ व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या समरगीत गायन स्पर्धेत वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या गायनकलेचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पणदूरतिठा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांघिक सादरीकरण करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

या उल्लेखनीय यशाबद्दल स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी कलाकारांचे तसेच मार्गदर्शक संगीत शिक्षक श्री. महेश तळगांवकर सर यांचे संस्था चेअरमन मान. श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव श्री. नागेंद्र परब, व्हा. चेअरमन मान. श्री. प्रकाश जैतापकर, संचालक मान. श्री. आनंद भोगले, मान. श्री. सुबीकाका अणावकर, मान. श्री. रविंद्र कांदळकर, मुख्याध्यापक श्री. एम. जी. कर्पे सर, पर्यवेक्षिका सौ. पी. पी. दाभोलकर व ग्रंथपाल श्री. नरेश परब सर यांनी संस्था व प्रशालेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व देशभक्तीपर उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

“सुरांच्या माध्यमातून देशभक्तीची भावना जागवित विद्यार्थ्यांनी मिळविलेला हा सन्मान शाळेसाठी अभिमानास्पद आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

🏆 द्वितीय क्रमांकाचे हे यश शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीतील मानाचा तुरा ठरले आहे.

सर्व विद्यार्थी कलाकार, संगीत शिक्षक, पालक व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन! 💐🇮🇳🎶

प्रतिक्रिया व्यक्त करा