You are currently viewing सुरण कबाब….

सुरण कबाब….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सुगरण मानसी बापट लिखित लज्जतदार पाककृती*

*सुरण कबाब….*

 

*साहित्य…*

1 वाटी उकडलेला सुरण, 1 वाटी उकडलेला बटाटा, आले लसूण पेस्ट 1 चमचा, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट,लिंबू रस एक चमचा,कॉर्नफ्लोअर 1 चमचा,तांदूळ पीठ 1 चमचा,1 चमचा बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ जिरे पावडर आवडत असल्यास.

कृती…

प्रथम एका बाउल मध्ये सुरण, बटाटा,आले लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट,जिरे पावडर,कॉर्नफ्लोअर, तांदूळ पीठ,बेसन पीठ,मीठ कोथिंबीर घालावी.त्यात च लिंबू रस घालून छान मळून घ्यावे. हाताला थोडेसे तेल लावून कबाब चा आकार द्यावा.कढई मध्ये तेल गरम करून छान गुलाबी रंगावर तळून घ्यावे.काही जण तांदूळ पिठी मध्ये घोळवून शॅलो फ्राय करतात.

आपले चविष्ट सुरण कबाब तयार.टोमॅटो saus बरोबर सर्व्ह करावेत.

 

सौ मानसी बापट बंगलोर

प्रतिक्रिया व्यक्त करा