You are currently viewing गोळा भात

गोळा भात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सुगरण सौ.संध्या कुलकर्णी लिखित चटकदार पाककृती*

*गोळा भात*

साहित्य: बेसन, तिखट, हिंग, मीठ, ओवा, खायचा सोडा, हळद, तिळ, जिरे, कडीपत्ता, लसूण, तांदूळ, तेल.

कृती:
बेसन पिठ 1 वाटी, त्यात तिखट, मीठं, ओवा, हिंग, हळद,तिळ, थोडा सोडा घालुन एकत्र करून हाताला तेल लावून त्याचे लांबट असे गोळे करून घ्यावे. कुकरमधे खाली तादूंळ व वर गोळे असे शिजवून गार करून घ्यावे.एका कढईत जास्त फोडणी करून त्यात जिरे, कडीपत्ता व भरपुर लसणाचे तुकडे( 1/2 वाटी) घालावे.मसाला मिरची पण घालावी .छान खमंग फोडणी करून घ्यावे. नंतर भात मोकळा करून त्यात गोळे फोडून कुस्करून घालावे त्यावर ही लसणाची खमंग फोडणी व थोडे मीठ घालुन छान मिक्स करावे आणि मिटक्या मारत खावे😋

टिप- पातेल्यात भात करणार असाल तर भात अर्धा शिजल्यावर त्यातच गोळे सोडले तरी चालतील)

सौ. संध्या कुलकर्णी, सातारा

प्रतिक्रिया व्यक्त करा