राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त ग्रामविस्तार अधिकारी मंगेश राणे यांचा १५ ऑगस्टला फोंडाघाट ग्रामपंचायतीत सत्कार
सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांच्या पुढाकाराने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव;
ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी चेअरमन व ज्येष्ठ नागरिक राहणार उपस्थित
फोंडाघाट, प्रतिनिधी :
ग्रामपंचायत प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झालेले फोंडाघाटचे ग्रामविस्तार अधिकारी मंगेशजी राणे यांचा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ध्वजारोहणानंतर होणार आहे. यावेळी राणे यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
याबाबत प्रतिक्रिया देताना अजित नाडकर्णी म्हणाले, “राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्याची दखल घेत मंगेश राणे यांना मिळालेला सन्मान हा फोंडाघाट गावासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि तरुणांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.”
