You are currently viewing पशुपालक बाबू खरात यांची सभापती सिद्धेश रावराणेनीं घेतली भेट
Oplus_16908288

पशुपालक बाबू खरात यांची सभापती सिद्धेश रावराणेनीं घेतली भेट

नुकसानभरपाईसाठी पाठपुराव्याची ग्वाही

वैभववाडी | प्रतिनिधी :

आचिर्णे येथे तुटलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का लागून गंभीर जखमी झालेल्या पशुपालक बाबू शामू खरात यांची वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे व आचिर्णेचे माजी सरपंच रूपेश रावराणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी बाबू खरात यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर दिला.

बुधवारी दुपारी विद्युत प्रवाह असलेल्या तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का लागल्याने बाबू खरात गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत त्यांच्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून काही शेळ्या जखमी झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेनंतर बाबू खरात यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात भेटीदरम्यान सभापती सिद्धेश रावराणे यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला. तसेच संबंधित शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावा करून मृत व जखमी झालेल्या शेळ्यांच्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा