You are currently viewing आनंदकंद

आनंदकंद

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका गझलकारा डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

 

आनंदकंद

गागालगा लगागा गागालगा लगागा

(*स* मधे)

 

सेवा सरस्वतीची, साधे समर्पणाने

समजा स्वतःस संधी, संपूर्ण साहसाने

 

संगीत संगतीला, संपन्नता सुगंधी

सूरासवे सलोखा, स्वरसाज स्पंदनाने

 

सुंदर समाजसेवा, सत्संगती सुसंधी

साक्षात स्वर्गसिद्धी, संकल्प साधल्याने

 

सत्संग साधण्याला, साधून सार्थ संगत

सान्निध्य समविचारी, सहवास सहकलाने

 

समतोल साधल्याने, संसार सौख्य साधे

सुटती सहज समस्या, संवाद साधण्याने

 

डॅा.शरयू शहा. मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा