You are currently viewing कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड – १९ लसीकरण शुभारंभ

कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड – १९ लसीकरण शुभारंभ

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

कसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात शहरातील ग्रामस्थांना लसीकरण करण्यात आले. तसेच ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या मधुमेह, रक्तदाब, दमा, वात विकार व अन्य व्याधीवरील रुग्णांना लस घेण्यासंदर्भात डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊनच आरोग्य केंद्रात लस देण्यात येणार आहे.

यावेळी कसाल जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव, कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत, पडवे सरपंच सुभाष दळवी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया निगुडकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाली राणे आदी मान्यवर उपस्थित होते.

कसाल शहरातील ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व ४५ ते ६० वयोगटातील रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रेया निगुडकर व डॉ. शिवाली राणे यांनी केले आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार ९ ते ५ या वेळेत सर्वांना मोफत कोविड लस देण्यात येणार आहे. आज दिवसभरात कसाल शहरातील ५१ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा