चेंदवण गावातील विद्यार्थी शैक्षणिक साहित्या पासुन वंचित रहाता नये यासाठी ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर यांचा पुढाकार कौतुकास्पद – – सौ अर्चना बंगे
कुडाळ (प्रतिनिधी)
चेंदवण गावातील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासुन वंचित रहाता नये यासाठी कुडाळ येथील मराठा क्लाॅथ सौजन्याने शिल्पा गौतम चेंदवणकर यांच्या पुढाकाराने शैक्षणिक साहित्य मिळते हे खरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी काढले
जिल्हा परिषद शाळा चेंदवण क्रं 1या शाळेमध्ये मराठा क्लाॅथ कुडाळ च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप सौ अर्चना बंगे आणि सरपंच श्री वैभव चेंदवणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सौ बंगे बोलत होत्या
यावेळी सरपंच श्री वैभव चेंदवणकर यांनी ही विचार मांडले
यावेळी सरपंच श्री वैभव चेंदवणकर, ग्रामपंचायत सदस्य नारायण शृंगारे, ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर, सौ प्रणाली तेंडुलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष भुपेश चेंदवणकर, माजी सरपंच सौ उत्तरा धुरी,शिल्पा चेंदवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोविंद भरडकर, पोलीस पाटील उमेश शृंगारे, बाळु कोचरेकर, अण्णा भरडकर, रवि तोरसकर, मुख्याध्यापक मसुरकर, सौ पाटील, जिवन विद्या मिशन चे महेश दळवी, सौ मधुरा दळवी, यांनीही मुलांना मार्गदर्शन केले, मुलांना शैक्षणिक स्वरुपात दप्तर वाटप करण्यात आले
