You are currently viewing महिलांनी दखलपात्र काम करावे ….

महिलांनी दखलपात्र काम करावे ….

जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाचे आयोजन

सिंधूदुर्गनगरी

चूल आणि मूल ही संकल्पना देशातील महिलांनी मोडून काढली आहे. महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असल्याचे सांगत महिलांच्या मेहनतीवर शासनाकडून एखादा पुरस्कार जाहीर होईल असे जिल्ह्यातील महिलांनी काम करावे असे आवाहन प्रभारी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी आज जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिनाचे उद्घाटन आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रा प ) दिपाली पाटील, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पाटील, जिल्हा विधी सेवा सल्लागार मृणाली नाईक, महिला कर्मचारी आदी उपस्थित होते. न्यूयॉर्क मधून महिला दीन साजरा करण्यास सुरुवात झाला असून आता ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जात आहे. चालुवर्षातील हा ११० वा जागतिक महिला दिवस आहे आणि हा दीन जिल्हा परिषद मध्ये साजरा केला जात असल्याचे प्रास्ताविक भाषणात स्पष्ट करण्यात आले. यावेळी जि.प. अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर म्हणाले की, प्रत्येक पुरुषाच्या यशाच्या मागे एका स्त्रीचा हात आहे. पूर्वी चूल आणि मूल ही संकल्पना सर्वत्र होती. मात्र आताच्या महिलांना ही संकल्पना मोडून काढली आहे. आता प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.

जिल्ह्यातील महिलाही अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. या महीलीलांनी चांगले काम करावे. जेणे करून शासनाकडून महिलांच्या मेहनती साठी पुरस्कार दिला जाईल असेही राजेंद्र म्हापसेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. सीईओ प्रजित नायर म्हणाले की, जागतिक महिला दिन साजरा करताना त्यात केवळ महिलाच असाव्यात असे काही नाही. पुरुषांचा ही समावेश असावं असे सांगत आपण ज्या वेळी जिल्हा परिषद मध्ये रुजू झालो तेव्हा इमारत पहिली असता इमारती मध्ये महिलांना आवश्यक असलेल्या सूचना करता याव्यात, त्यांना कोणत्या सुविधा हव्या आहेत त्या सुचविण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये सूचना पेटी ठेवण्यात येणार आहे. या सूचना पेटी मध्ये महिलांनी लेखी सूचना कराव्यात त्यावर निश्चितच उचित कार्यवाही केली जाईल असे श्री नायर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. १९ नोव्हेंबर हा पुरुष दिनही साजरा करणार ८ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. तर १९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दीन असून हा दीन आवश्यक त्यात प्रमाणात साजरा केला नाही. मात्र चालू वर्षात हा दीन जिल्हा परिषद मध्ये साजरा केला जाणार असल्याचे सीईओ प्रजित नायर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा