कासार्डे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात महिला दिनाचे औचित्य साधून मुलींसाठी खास गो गर्ल गो धावणे स्पर्धेचे आयोजन करुन यावर्षी चा ८मार्च हा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे साहेब यांच्या सुचनेनुसार कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयात *गो गर्ल गो* ही स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेला १२ते १८ वयोगटातील ७० पेक्षा अधिक मुलींनी तीन्ही गटातून सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, उपाध्यक्ष बापूसाहेब बंड, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाड्ये, प्राचार्य राजेंद्र नारकर, क्रीडाशिक्षक दत्तात्रय मारकड,यशवंत परब,ऋषिकेश खटावकर यांच्या उपस्थितीत झाला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड, सहाय्यक शिक्षक यशवंत परब, ऋषिकेश खटावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यामध्ये ४००,८००,व ३०००मी धावणे स्पर्धेचा समावेश होता.
माहिला दिनानिमित्त अनेक ठिकाणी महिलांसाठी उपक्रम राबविले जातात कासार्डे माध्यमिक विद्यालयाने हा महिला दिन मुलींसाठी खास स्पर्धा घेऊन उत्साहात साजरा केला.
यशस्वी सर्व खेळाडूंचे स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाडये,व प्राचार्य राजेंद्र नारकर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे ,नानसिंग बस्सी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
कासार्डे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक विद्यालय आयोजित’ गो गर्ल गो’ स्पर्धेचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष परशुराम माईनकर,सोबत बापूसाहेब बंड, प्रभाकर कुडतरकर, मधुकर खाड्ये, राजेंद्र नारकर, दत्तात्रय माळकर यशवंत परब व इतर