You are currently viewing संत बहेणाबाई

संत बहेणाबाई

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“संत बहेणाबाई”*

 

बहेणाबाई महाराष्ट्रातील संत महान

संघर्षाला जाई सामोरी करी अक्षय कल्याणIIधृII

 

बहीणाबाईंचा जन्म झाला देवगावी खेड्यांत

माता जानकी पिता आऊदेव देवभक्त

बहिणाबाईंना बंधू दोन कुटुंब लहानII1II

 

आऊदेवांना सापडली सोन मोहर रस्त्यांत

वीरेश्वर ज्योतिषान कथिले बहेण भाग्यवान

गीता शिकण्यासाठी संथा मिळाली पित्याकडूनII2II

 

प्रस्थापिताला सांभाळी परिस्थितीला देई छेद

मुघलांच्या जुलमाला करी कडवा विरोध

चेतना देई सर्वांना प्रतिकार शिकवणII3II

 

संस्कार जाहले अध्यात्माचे बालपणापासून

माते सोबत जाई कीर्तनाला होई तल्लीन

लिहिले अनेक अभंग करी कथा कीर्तनII4II

 

आईला घर कामात करी मदत सुजाण

बहेणाला मागणी घातली शिरूरच्या पाहुण्यानं

तीस वर्षीय बिजवराशी लग्न लावले पित्यानII5II

 

संसार न सोडता पत्नी धर्म करी पालन

जोडतो तो धर्म नि तोडतो तो अधर्म होतं

बहेणा आपल्या आचरणातून करी सिद्धII6II

 

पतीने केला छळ अनन्वित करी सहन

जयराम स्वामींनी केले पतिचे मन परिवर्तन

स्वप्नी दिसे विठ्ठल तुकोबांनी केले अनुग्रहितII7II

 

©️काव्य:श्री अरुण गांगल कर्जत.रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा