*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर लिखित अप्रतिम षडाक्षरी काव्यरचना*
*नादब्रम्ह*
कंकण करात
किणकिणतात
पैंजण पायात
रुणझुणतात
नादात माझ्या मी
हरपते भान
संगीत ऐकते
देऊनिया कान
खळखळ वाहे
चपळ सरिता
अल्लड निर्झर
बेभान रांगता
गाज मी ऐकते
सागरकिनारी
कोकिळ कूजन
आम्रतरूवरी
दामिनी कडाडे
जलदांचा ताल
बरसतो मेघ
स्वरात मल्हार
कृष्णाची बासरी
धुन ती मधुर
संतोषते चित्त
ऐकुनिया सूर
संगीतमय हा
विश्वाचा पसारा
नादब्रम्ही डोले
संसार हा सारा
*अरुणा मुल्हेरकर*
