You are currently viewing महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेतर्फे महाकवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून केला आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा
Oplus_16908288

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्थेतर्फे महाकवी कालिदास जयंतीचे औचित्य साधून केला आठ पुस्तकांचा प्रकाशन सोहळा

पुणे:

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे संस्था विविध साहित्यिक कार्यक्रम घेऊन साहित्य सेवेचा वारसा जोपासत आहे. महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्थेमध्ये अनेक प्रस्थापित तसेच नवोदित साहित्यिक सदस्य असून संस्था वेळोवेळी साहित्यिकांना मराठी साहित्य लेखनासाठी प्रोत्साहन देते. याचाच एक भाग म्हणून संस्थेने संस्थेच्या सदस्यांची आठ पुस्तके प्रकाशित करून प्रोत्साहन देण्याचा एक वेगळा पायंडा घातला आहे.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात खालील मान्यवरांची पुस्तके प्रकाशित झाली.

•वि.ग.सातपुते. :- भावांजली. • ऍड. संध्या गोळे :- चारोळी संग्रह. • महालिंग मेणकुदळे :- शेजारच्या घरातील ( कादंबरी ). • महालिंग मेणकुदळे :- पती माझे विश्वविक्रमी ( संगीत नाटक ). •प्रा.अशोक बलभीम बाबर :- महाकवी कालिदासकृत संगीत स्वर काव्यांजली. • संगीतस्वर मेघदूत. • संगीतस्वर गौरीशंकर. • सांगितस्वर मौतिक माला अशी आठ पुस्तके महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेतर्फे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आली. संस्था दरवर्षी कवी लेखकांची पुस्तके प्रकाशित करीत असते आजपर्यंत संस्थेने एकूण 75 पुस्तके प्रकाशित केली आहेत.

साहित्य क्षेत्रात कवी, लेखक, कलाकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे, त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य संस्था अविरत करते आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा