You are currently viewing अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त शाळांमध्ये वह्या वाटपाचा उपक्रम

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त शाळांमध्ये वह्या वाटपाचा उपक्रम

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त शाळांमध्ये वह्या वाटपाचा उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप; शिक्षक, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

सावंतवाडी :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कलंबिस्त प्राथमिक शाळा क्र. १ आणि प्राथमिक शाळा क्र. २ येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुरेश गवस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात वह्यांसह खाऊचेही वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी दोन्ही शाळांचे शिक्षक, विद्यार्थी तसेच सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, निवृत्त आर्मी ब्लॅक कमांडो प्रकाश सावंत, राजेश पास्ते, अशोक पास्ते (बाळा पास्ते), श्याम कलंबिस्कर आणि भाई सावंत यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा