You are currently viewing झणझणीत भुरका

झणझणीत भुरका

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या सुगरण सौ.मानसी बापट लिखित तजेलदार रेसिपी*

 

*झणझणीत भुरका*

 

साहित्य : १ छोटी वाटी पातळ पोहे भाजलेले,१ छोटी वाटी बारीक चिरलेली लसूण,लाल तिखट २ चमचे,कोथिंबीर बारीक चिरून २ मोठे चमचे तेल.

कृती : प्रथम कढई मध्ये तेल गरम करावे.त्यात मोहरी,हिंग घालून फोडणी करावी. हळद घालावी.आता बारीक चिरलेली लसूण घालून लाल होईस्तोपर्यंत परतावे.नंतर त्यात भाजलेले पोहे टाकावे,मीठ लाल तिखट आणि कोथिंबीर टाकावी.जरासे परतावे. भुरका करताना त्या वर झाकण ठेवू नये.आता आपला भुरका खाण्यास तयार आहे.

 

*सौ मानसी बापट बंगलोर*

प्रतिक्रिया व्यक्त करा