You are currently viewing कुडाळ एसटी बसस्थानकात नगरसेवक मंदार शिरसाट यांच्याकडून डास प्रतिबंधक फवारणी

कुडाळ एसटी बसस्थानकात नगरसेवक मंदार शिरसाट यांच्याकडून डास प्रतिबंधक फवारणी

कुडाळ एसटी बसस्थानकात नगरसेवक मंदार शिरसाट यांच्याकडून डास प्रतिबंधक फवारणी

साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी स्वखर्चातून उपक्रम; शहरात टप्प्याटप्प्याने फवारणी व वृक्षारोपणाचा संकल्प

कुडाळ

पावसाळी हंगामात डेंग्यू, कॉलरा, हिवताप यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत कुडाळ एसटी बसस्थानक परिसरात स्वखर्चातून डास (मच्छर) प्रतिबंधक फवारणी केली.
कुडाळ एसटी बसस्थानकातून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची ये-जा होत असल्याने स्थानक परिसर, स्वच्छतागृहे तसेच डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी ही फवारणी करण्यात आली. या उपक्रमामुळे साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी नगरसेवक मंदार शिरसाट यांच्यासह संदीप महाडेश्वर, संदेश पडते, संतोष शिरसाट, मंदार चंद्रकांत शिरसाट, रूपेश तुळसकर, निनाद हिर्लेकर आणि भूषण कुडाळकर उपस्थित होते.
नगरसेवक मंदार शिरसाट यांनी यापूर्वीही कुडाळ शहरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले असून, या रोगप्रतिबंधक फवारणी उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे. आगामी काळात शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ शहरात टप्प्याटप्प्याने मच्छर प्रतिबंधक फवारणी तसेच वृक्षारोपण मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा