You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयात काव्य संमेलन संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात काव्य संमेलन संपन्न

वैभववाडी महाविद्यालयात काव्य संमेलन संपन्न

वैभववाडी

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार मा.विनोदजी तावडे साहेब यांचा वाढदिवसानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील भाषा वाङ्मय मंडळाच्या वतीने प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाचचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.माणिक चौगुले,
स्टाफ सचिव प्रा.सुरेश पाटील, वाड्:मय विभाग व मराठी विभाग प्रमुख प्रा.संजीवनी पाटील,
हिंदी विभाग प्रमुख प्रा.आनंदा कांबळे, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. वंदना काकडे उपस्थित होते.
२० जुलै हा माननीय तावडे साहेबांचा जन्मदिवस. त्यांना शुभेच्छा पर असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून कविता सादर केल्या. त्यामध्ये स्नेहा बिडये, पुनम पावले, साहिल नर, संदेश मुगदार, प्राची तावडे, प्रगती तावडे, साक्षी कातकर, मिसबाह मुल्ला, संपदा पुजारी, सानिका कांबळे, समृद्धी नागप, प्राची पांचाळ, आकांक्षा खाडे, नूतन लिंगायत, श्रेया तावडे आणि संपदा जाधव यांचा सहभाग होता. तर प्रा. डॉ. हेदुळकर, प्रा. डॉ. गुलदे यांनीही कवितांचे सादरीकरण केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना कवितेचे वेगळेपण सांगत आपल्या दैनंदिन जीवनातील आनंद कवितेतून कसा व्यक्त करता येतो, याचे सुंदर विवेचन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषा वांग्ङमय मंडळाच्या विभाग प्रमुख प्रा.सौ. संजीवनी पाटील यांनी केले तर आभार प्रा.आनंदा कांबळे यांनी मानले. संस्कृती कांबळे हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा