*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शेवटचे हळदी कुंकू*
ताटातले हळदी कुंकू पाहुण
तिची आठवण दाटून येते
अंगणातली तुळस ही
घरात डोकावून पहाते
तिच ओठांवरच हलकस हसु
सारख सारख डोळ्यांना दिसतय
तिच्या सहवासातल्या आठवणीनं
एकटेपण वाटतयं
ती होती तेंव्हा जणू
रोजच घरात उत्सव असायचा
ती होती म्हणूनच
देवघरात दिवा पेटायचा
तिची घरातली धावपळ
डोळ्यासमोर दिसतेय
तिची आहो आहो हाक
अजूनही कानाला ऐकू येतेय
खरच…..
एका कुंकवाच्या ठिपक्यात
ती मला समावून घ्यायची
सुख दुःखच्या प्रत्येक क्षणी
मझ्या सोबत असायची
तिची शेवटची ओटी भरताना
खर पटायच नाही
तिच्या कपाळी कुकूं लावताना
हात पुढे व्हायचा नाही
तिला निरोप देताना
ताटातल हळदी कुंकू संपल होत
पण तिच्या मंगळसूत्रामध्ये
तिच जगणं राहील होत
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९२७९११३५४७
