उमरगा :
उमरगा येथील समाज विकास संस्था आणि दान उत्सव समिती महाराष्ट्राचे मित्रगण यांनी श्रुती बाबासाहेब कांबळे हिचा 3551 रुपये आणि भूमिपुत्र वाघ यांची प्रकाशित झालेली पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉक्टर कल्पना निखिल वाघ, व्यंकट पोद्दार,संजय कोथळीकर सर,अनिता कुलकर्णी पुणे, इंजिनिअर मनोहर सूर्यवंशी, मुरजानी साहेब पूनम क्लोथ उमरगा, सुरेखाताई चौगुले- नारायणकर,रवींद्र पोतदार सर,यांच्या सहभागातून 3551रुपये बक्षीस देऊन श्रुती कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
डेहराडून या ठिकाणी झालेल्या आईस हॉकी नॅशनल लेव्हलवरच्या स्पर्धेमध्ये तिने विशेष प्राविण्य मिळवलं आहे. म्हणून समाज विकास संस्था मित्रपरिवार दान उत्सव समितीचे सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं.
बाबासाहेब कांबळे हे पोलीस दलामध्ये उमरगा ब्रांचला रुजू आहेत स्वभावाने शांत, सय्यमी,मितवासी आशा या देवगुनी वडिलांच्या मार्गदर्शनाने श्रुतीने एवढ्या लहान वयामध्ये यशस्वीता गाठली म्हणून संस्थेच्या वतीने तिचे कौतुक केले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून किसन बाबरे इंजिनियर उमरगा रवींद्र पोतदार,यांना खास निमंत्रित करण्यात आले होते.या प्रमुख पाहुण्यांनी श्रुती कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. तर आदर्श पालक म्हणून पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कांबळे यांना भूमिपुत्र वाघ यांची प्रकाशित झालेली पुस्तके सप्रेम भेट देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन समाज विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले होतं. कार्यक्रमाचे व्यवस्थापन अस्मिता सुरवसे यांनी केलं.तर आभार भूमिपुत्र वाघ यांनी मांनले.
