You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्यावर पुत्रशोक

ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्यावर पुत्रशोक

ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांच्यावर पुत्रशोक; समर्थ गावडे यांचे दुःखद निधन

सावंतवाडी :

येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचे द्वितीय चिरंजीव समर्थ सीताराम गावडे (वय १६) यांचे बुधवारी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले.
समर्थ गेली १५ वर्षे मेंदूच्या विकारामुळे अंथरुणाला खिळून होता. जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी त्याच्या छोट्या मेंदूला (सेरेबेलम) इजा झाल्याने त्याची प्रकृती गंभीर राहिली होती. त्याच्या उपचारासाठी विविध ठिकाणी वैद्यकीय उपचार करण्यात आले; मात्र अखेर बुधवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.
त्याच्या पश्चात आई संयुक्ता, वडील सीताराम, भाऊ साईश, बहिणी तसेच काका, काकी असा परिवार आहे.
समर्थ याच्यावर बुधवारी रात्री सावंतवाडी येथील उपराळ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे गावडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पत्रकार, सामाजिक व विविध क्षेत्रांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा