*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रिटायरमेंट नंतरच जगणं*
*एक अवघड प्रवास*
रिटायर झालो त्या दिवशी
हातात फुलांचा गुच्छ होता
मनाच्या एका कोपऱ्यात
अंधारात दाटला होता
पहिली पायरी चढताना
खूपच अवघड वाटत होतं
माझी वाट बघायला
दारावर कोणीच उभं नव्हतं
जेव्हा पदावर होतो तेव्हा
सारेच कसे अवतीभवती गोळा व्हायचे
लागलीच एक ग्लास पाणी घेऊन
सारेच कसे धांवत यायचे
माझ्या येण्याची वाट पहात
कितीदा फोन करायचे
एवढा का उशीरा झाला म्हणत
अनेक प्रश्न विचारायचे
जेवणाची ताटं माझ्याशिवाय
कधीच वाढली जात नव्हती
जेवता जेवता नातवंडं सरे
अंगाखांद्यावर खेळत होती
दिवसभरातून कितीदा
बाबा म्हणून होकार द्यायचे
सुटीच्या दिवशी कुठेतरी
सहलीला घेऊन जायचे
आता रिटायर झालो आणि
सगळंच हळूहळू बदत गेल
जिवाभावाचे आपलेपण
कोणत्या तरी वळणावर हरवलं
दिवसभर घरात असतो
पण घराला मी दिसत नाही
कालपर्यंत माझी वाट बघणाऱ्यांना
माझी गरज भासत नाही.
माझ्या सोबत जेवणारे
आता एकटेच जेवण करून घेतात
सर्व सोबत एकत्र गप्पा करणारे
आता मोबाईलमधे हरवून जातात
कधी बोलायला गेलो तर
फारचं बोलत कोणी नाही
कुठे बाहेर जरी गेलो तरी
फोन कुणाचा येत नाही
फोनची घंटी शांत झाली
चौकशी करणं थांबवलं आहे
माझं असण्याच मोल जणू
काळाच्या ओघात विरल आहे
कधी कधी मन हळवं होतं
डोळ्यात पाणी दाटून येतं
आपुलकीचा हात सुटणं
मानाला फार टोचून जातं
रिटायर झालो म्हणून काय झालं
सगळ्यांनी कायम जवळ यावं
दोन शब्द प्रेमाचे बोलून
गुण्यागोविंदाने रहावं
पण..खरचं….
रिटायरमेंट नंतरच जगणं
फारच अवघड होऊन बसत
घरात सर्वजण असताना
सोबत कोणी नसतं
नोकरीत असताना
घरी येण्याचा उत्साह वेगळाच असायचा
बाबा आले बाबा आले होकाराने
घारात आनंदाचा सडा पडायचा
आता समजलंय
माणूस जसा नोकरीतून रिटायर होतो
तसा माणसांच्या मानातून होतो
ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवल
त्यांच्यापासून हळूहळू दुर जातो
मग जाणवतं
माणसाच दुःख पद गेल्याचं नसतं
आपल्याच माणसांच्या
बदललेल्या नजरेच असतं
कारण….
रिटायरमेंट नंतरच जगणं
एक अवघड प्रवास असतो
वाटत तेव्हढा तो रस्ता
सहज आणि सोपा नसतो
तेव्हा काही जरी झाल तरी
माणसाच्या नोकरीची निवृत्ती असावी
पण आपल्याच माणसाला विसरण्याची सुरवात नसावी
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
_________________________
*संवाद मीडिया*
रत्नागिरी जिल्ह्यात गेली 22 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा आणि 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या संस्थेचे
रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी मध्ये नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी
रत्नागिरी कॉलेज ऑफ नर्सिंग , रत्नागिरी.(Affiliated MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त)
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2026-2027
🔸 *कोर्सचे नांव-
💠*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
💠*(ANM)ऑक्सिलरी नर्स मिडवाइफ*
•Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).
👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).
संधी –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.
आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.
पत्ता:
ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ,करावांचीवाडी ,रत्नागिरी, 415612
📞 संपर्क:
9960906947 / 9422620047
कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.
जाहिरात लिंक👇
https://sanwadmedia.com/204123/
───
संवाद मीडिया
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क
9421234663
