मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये ‘इन्वेस्टीचर सेरेमनीचे’ शिस्तबद्ध आयोजन
(अधिकारांची व कर्तव्यांची जाण ठेवून नेतृत्वगुण विकसित करा: युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसलेंचा विद्यार्थ्यांना कानमंत्र)
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी मध्ये इन्वेस्टीचर सेरेमनीचे दिमाखात व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने तसेच राजमातांच्या प्रतिमापूजनाने झाले. यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिं.जि.शि. प्र.मंडळाच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उपस्थित होत्या.त्याचप्रमाणे मंडळाचे संचालक श्री डी. टी. देसाई ,सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, सदस्य श्री जयप्रकाश सावंत व डॉ . सतिश सावंत, मुख्याध्यापिका श्रीम. अनुजा साळगांवकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रशालेच्या सहशिक्षिका श्रीम .लविना आल्मेडा यांनी या सेरेमनीचा उद्देश त्याचप्रमाणे स्कूल हाऊसेसची रचना, स्कूल हेड बॉय, हेड गर्ल, प्रीफेक्ट्स तसेच पर्झीवरन्स,ऑनर, पीस व ब्रेव्हरी या हाऊसेसच्या कॅप्टन्सची कर्तव्ये समजावून सांगितली. तद्नंतर शैक्षणिक वर्ष 2026- 27 च्या ‘ॲपेक्स’ या प्रेरणादायी लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व लीडर्सना बॅचेस देऊन अधिकार प्रदान करण्यात आले. यानंतर लीडर्सना जबाबदारीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील शिस्तीचे महत्व समजावून सांगितले. अपयशाने खचून न जाता प्राप्त संधीचा सुयोग्य वापर करून यशस्वी व्हावे व अधिकारांची, कर्तव्यांची जाण ठेवून नेतृत्वगुण विकसित करावे असा कानमंत्र दिला. तसेच सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या . यावेळी युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी यश सावंत, करीष्मा मांजरेकर, अथर्वी मांजरेकर यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.लवीना आल्मेडा व श्रीम. इंतजिया फर्नांडिस यांनी केले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम.लविना आल्मेडा, श्री. भूषण परब यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी देखील सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले यांनी शुभेच्छा दिल्या.
