You are currently viewing ‘बांधावरची शिवार शाळा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला भातरोपणीचा प्रत्यक्ष अनुभव

‘बांधावरची शिवार शाळा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला भातरोपणीचा प्रत्यक्ष अनुभव

‘बांधावरची शिवार शाळा’ उपक्रमात विद्यार्थ्यांनी घेतला भातरोपणीचा प्रत्यक्ष अनुभव

कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा मळगाव येथे शेतात सहभाग; शेतीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन

सावंतवाडी

येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘बांधावरची शिवार शाळा – २०२६’ या उपक्रमात प्रत्यक्ष भातरोपणीचा अनुभव घेतला. मळगाव येथील शेतकरी दीपक मेस्त्री यांच्या शेतात विद्यार्थ्यांनी भाताचे रोप काढणे, रोपांची लागवड करणे तसेच शेतीची विविध कामे प्रत्यक्ष पाहून अभ्यासली.
यावेळी दीपक मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना भातशेतीचे महत्त्व, भातरोपणीची पद्धत आणि शेतीतील आधुनिक बाबी याविषयी प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने चिखलात उतरून भात लावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
वर्गाच्या चार भिंतीबाहेर निसर्गाच्या सानिध्यात घेतलेला हा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, आनंददायी आणि संस्मरणीय ठरला. शेतीचे महत्त्व आणि श्रमसंस्कार यांची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विशेष पसंतीस उतरला.
या उपक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, शिक्षक एस. यू. बांदेलकर, अनिल ठाकूर, पी. बी. बागुल, स्थानिक अंगणवाडी सेविका श्रीमती खडपकर, श्रीमती राणे तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक अनिल ठाकूर यांनी शेतशिवार उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल दीपक मेस्त्री दांपत्याचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा