You are currently viewing रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेने सावंतवाडीतील जि.प. शाळा क्रमांक ४ व ५ दत्तक
Oplus_16908288

रविंद्र चव्हाण यांच्या प्रेरणेने सावंतवाडीतील जि.प. शाळा क्रमांक ४ व ५ दत्तक

ॲड. अनिल निरवडेकर यांची घोषणा; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षणाच्या गुणवत्तेसह सुविधा वाढविण्यासाठी कटिबद्ध

सावंतवाडी :

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा आदर्श घेऊन सावंतवाडीतील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ४ आणि शाळा क्रमांक ५ या दोन्ही शाळा आपण दत्तक घेत असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली. आपण स्वतः जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असल्याने या शाळांबद्दल विशेष आत्मीयता असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे तसेच शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक ४ येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ॲड. अनिल निरवडेकर यांच्या संकल्पनेतून व माध्यमातून शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर व इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक महेश पालव यांचा वाढदिवसही सर्व विद्यार्थी व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना गौरव मुळीक यांनी सांगितले की, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सर्व कार्यकर्ते काम करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही सुविधा कमी पडू दिल्या जाणार नाहीत. तसेच शाळांमधील रिक्त पदांवर लवकरात लवकर चांगले शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांगुरे, पत्रकार हरीशचंद्र पवार, विनायक गवस तसेच छावा संघटना सावंतवाडीचे अध्यक्ष संतोष तळवणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, छावा संघटनेचे अध्यक्ष संतोष तळवणेकर, मुख्याध्यापक महेश पालव, साईनाथ जामदार, शेलेस्तीन फर्नांडिस, शिवा गावडे, ज्ञानेश्वर पारधी, तसेच शिक्षिका पूजा शिंदे, अनघा निरवडेकर, लक्ष्मी धारगळकर, अंजना घाडी, प्रणिती सावंत, दक्षता गावस, वर्षा नाईक, शिल्पा जाधव यांच्यासह अन्य शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा